डॉ. सचिन राजूरकर यांना आयुष महासन्मान पुरस्कार-२०२५

डॉ. सचिन राजूरकर यांना आयुष महासन्मान पुरस्कार-२०२५

कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपण तालुक्यातील नांदा फाटा येथील मूळ रहिवासी व सद्या लाठी येथे वास्तव असलेले येथील सुप्रसिद्ध डॉ. सचिन राजूरकर
यांना 14 सप्टेंबर रविवार रोजी *आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व विस्तार केन्द्र- राजकोट टीडीसी (पीपीडीसी) आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार ची संस्था* यांच्या संयुक्त वतीने अतिशय प्रतिष्ठेचा *आयुष महासन्मान पुरस्कार 2025* मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तारांकित हॉटेलला नवी मुंबई तेथे देण्यात आला. हा पुरस्कार *आयुर्वेद, योग नेचरोपैथी, होमियोपैथी, युनानी, सिद्ध, एक्युपंचर, एक्युप्रेशर अशा विविध आयुष क्षेत्रात* उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चिकिसकांना व थेरपिष्ट यांना देण्यात आला
या पुरस्काराला भारतातील शेकडो आयुष चिकित्सक व थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*प्रमुख पाहुण्यांमध्ये सिनेस्टार श्रेया बुगडे, चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले* सोबत
*डॉ मंगला कोहली सल्लागार युनायटेड नेशन चाईल्ड वुमेन व पूर्व सहायक महानिदेशक, स्वास्थ सेवा निदेशालय, स्वास्थ एवं परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार*, *डॉ प्रवीण जोशी राष्ट्रीय सलाहकार आईमा एव पूर्व उप निदेशक टिडीसी आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्थान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते* *तसेच विशेष अतिथी*
*श्री गणेश एम.- साहायक संचालक विस्तार केन्द्र- राजकोट व उदयपूर एमएसएमई टीडीसी ( पीपीडिसी) आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत* *सरकार संस्थान व प्रशिक्षण अधिकारी राजकोट एमएसएमई श्री प्रणव पंडया उपस्थित होते*

तसेच इतर प्रमुख उपस्थितीमध्ये *डॉ नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन चे व्हाईस चेअरमन*,
*राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बाबुराव कानडे*
*आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन चे पदाधिकारी* *डॉ. दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, डॉ रवी शिंदे,डॉ रचित म्हात्रे, डॉ जनार्धन यादव*,
*डॉ विनोद ढोबळे, डॉ राकेश झोपे, डॉ श्री भूषण नागरे, डॉ विजय नवल पाटील, डॉ फुके डॉ रामेश्वर शिंदे,योगाचार्य भानुदास परबत, डॉ रावसाहेब घोडेराव, डॉ धिरज मेश्राम, प्रवक्ते श्री तुषार वाघूळदे* इतर *आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते*.
डॉ. सचिन राजूरकर यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरावरून डॉ. सचिन राजूरकरयांचे कौतुक होत आहे व शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें