पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न

(चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)

शासकीय आदेशानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील आनंदीबाई बंकट मुलांच्या हायस्कुलमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, त्याचाच एक भाग म्हणून चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली, विद्यार्थ्यांनी मुक्तपणे रंगांची व विचार कल्पकतेची उधळणी केली. चित्रकलेसाठी आत्मनिर्भर भारत, पर्यावरण संवर्धन, आजची आवश्यकता, ऑपरेशन सिंधुर, डिजिटल इंडिया, भारतीय संस्कृती व सण, स्वच्छ भारत, सुंदर भारत, स्वदेशी वस्तूंचा वापर या विषयांवर सदरील चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विलास भोई, व वीरेंद्र पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी कलेतील बारकावे देखील समजवून सांगितले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. पी. पाटील, पर्यवेक्षक प्रशांत नेरकर, पर्यवेक्षिका सुनीता कासार, तसेच कलाशिक्षक चेतन कुऱ्हाडे व चित्रकार दिनेश चव्हाण यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन मिळाले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal