पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना ‘शहीद वीर भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
(चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
भ्रष्टाचार निर्मूलनाच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना ‘अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती’ आणि ‘ब्रिक्स ह्यूमन राइट्स मानवाधिकार मिशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शहीद वीर भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. हा प्रतिष्ठित पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात महेंद्र सूर्यवंशी यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. यात नवनाथ मांडे, मनीषा मांडे, सोमनाथ गायकवाड, रवींद्र निकम आणि भगवान गायकवाड यांचा समावेश होता. ‘अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती’ आणि ‘ब्रिक्स ह्यूमन राइट्स मानवाधिकार मिशन’ने आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल महेंद्र सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केला. या आंदोलनामुळे प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण समारंभासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. हा पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सक्रिय असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचा गौरव असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.













