शारदीय नवरात्र उत्सव निमित्त चाळीसगाव येथे सोमवार पासून अखंड हरिनाम किर्तन सप्ताह
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
शहरातील महाराणा प्रताप चौक पाटील वाडा येथे जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सव निमित्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सोमवार दिनांक २२ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या सप्ताहात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार महाराजांचे किर्तन होणार असून बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सोमवार दिनांक २२ रोजी कार्यक्रमाची सुरुवात करतील ह.भ.प. रविंद्र महाराज गोताणे, मंगळवार दिनांक २३ रोजी ह.भ.प. जितेश महाराज म्हसावद, बुधवार दिनांक २४ रोजी ह.भ.प. भावेश महाराज विटनेर, गुरुवार दिनांक २५ रोजी ह.भ.प. किशोर महाराज कासोदा, शुक्रवार दिनांक २६ रोजी ह.भ.प. भूषण महाराज अंबापिंप्री, शनिवार दिनांक २७ रोजी ह.भ.प. ईश्वर महाराज पाळधी, रविवार दिनांक २८ रोजी ह.भ.प. दिपक महाराज मुक्ताईनगर, सोमवार दिनांक २९ रोजी ह.भ.प. मुरलीधर महाराज साक्री, मंगळवार दिनांक ३० रोजी ह.भ.प. लिलाधर महाराज ओझर, बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. सावता महाराज मोहाडीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. कीर्तनाची वेळ ही रात्री ८: ३० ते १०:३० अशी असणार आहे. पाऊस आल्यास कीर्तनाचा कार्यक्रम लक्ष्मीनारायण मंदिर येथे होईल. याची भाविकांनी नोंद घ्यावी.













