कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी  : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या राज्यातील शेतकरी, महिला शेतकरी संस्था/गट, कृषी पत्रकार यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषीभूषण, सेंद्रीय शेती कृषीभूषण, उ‌द्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना प‌द्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारांसाठी इच्छुकांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तरी जास्तीत जास्त शेतकरी /गट/संस्था/व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करणेबाबत. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें