जवाहर नवोदय विद्यालयात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु
सातारा प्रतिनिधी : जवाहर नवोदय विद्यालय, सातारा येथे २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी विज्ञान व वाणिज्य शाखांसाठी इयत्ता अकरावी प्रवेशाकरिता अर्ज मागविण्यात येत असून इच्छुकांनी 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य ॲन्सी ए.जे. यांनी केले आहे.
दहावीच्या परीक्षेत ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी, पालकांचे सातारा जिल्हयातील रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रवेशासाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन प्रक्रियेतून सोपी केली आहे. जवाहर नवोदय विद्यालय अकरावी प्रवेश २०२५ साठी डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅबद्वारे https://forms.gle/dXHaYWdpD8ZnK3Gu7 साठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Author: AVB Majha
Post Views: 216











