खंडाळा तालुक्यात 1 ते 7 ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन
लोणंद प्रतिनिधी : आबासो धायगुडे
खंडाळा : महसूल विभागाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये विशेष मोहिमा, शिबिरे, उपक्रम व महसूल अदालतींचे आयोजन केले जाणार आहे. खंडाळा तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अजित पाटील यांनी केले आहे.
तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत तहसीलदार पाटील यांनी महसूल सप्ताहाची रूपरेषा मांडली. यावेळी नायब तहसीलदार हेमंत कामत, दत्तात्रय गवारी व महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.
महसूल सप्ताहाचे महत्त्वाचे दिवस व उपक्रम:
1 ऑगस्ट:उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी यांचा गौरव.
विभागीय स्पर्धेत यशस्वी ठरलेल्यांचा सत्कार.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित बाबी सोडवण्याचे मार्गदर्शन
कलम 155 अंतर्गत अर्ज ई-हक्क पोर्टलद्वारेच स्वीकारले जाणार.
2 ऑगस्ट:2011 पूर्वी अतिक्रमण करणाऱ्यांना शासकीय पट्टे वाटपाचा कार्यक्रम पात्र कुटुंबांची यादी तयार करण्याचे निर्देश.
3 ऑगस्ट:पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी, अतिक्रमण निष्कासन
दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम
अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या जाणार.
4 ऑगस्ट:छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान विविध दाखले (आधार, जात, उत्पन्न, अधिवास इ.) वाटप.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे वितरण व ताबा देणे.
5 ऑगस्ट:DBT (थेट लाभ हस्तांतरण) विशेष मोहिम अपूर्ण DBT लाभार्थ्यांच्या घरी भेट शिधापत्रिकांची KYC प्रक्रिया
6 ऑगस्ट:शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासन शर्तभंग प्रकरणांची पाहणी व कार्यवाही
नियमानुसार सरकारजमा किंवा नियमितीकरण .
7 ऑगस्ट:महसूल सप्ताहाचा समारोप आठवड्याभरातील उपक्रमांचे मूल्यांकन व उल्लेखनीय कामकाजाचा गौरव महसूल सप्ताहाच्या माध्यमातून जनतेला शासकीय सेवा पारदर्शकपणे व जलद गतीने मिळाव्यात, या उद्देशाने महसूल विभाग सतत कार्यरत आहे. सर्व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन तहसीलदार अजित पाटील यांनी केले आहे.













