लोणंदच्या सौ छाया पांडुरंग कुंभार उत्कृष्ट अंगणवाडी मदतनीस पुरस्काराने सन्मानित
खंडाळा प्रतिनिधी गणेश गुरव
अहिल्यानगर येथे द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळा 2025 गौरव सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये लोणंद येथील अंगणवाडी मदतनीस भंडलकर वस्ती येथे सेवेत रुजू असणाऱ्या सौ छाया पांडुरंग कुंभार यांना उत्कृष्ट अंगणवाडी मदतनीस म्हणून माननीय या सोहळ्याचे अध्यक्ष श्री शंकर मिसाळ (मुख्य अग्निशामक अधिकारी अहिल्यानगर) तसेच माननीय श्री प्रल्हाद गीते पोलीस निरीक्षक (अहिल्यानगर) यांच्या हस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी सन्मानपत्र व मेडल देऊन अहिल्यानगर येथे सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर येथे दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड अहिल्यानगर येथे भव्य दिव्य अशा सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक राष्ट्र अध्यक्ष आदरणीय अन्सार शेख सर उपराष्ट्राध्यक्ष आदरणीय जीवन मोहिते सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून (मुख्य अग्निशमन अधिकारी अहिल्यानगर) शंकर मिसाळ साहेब प्रांताधिकारी सुधीर पाटील सर पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते साहेब (महामार्ग पोलीस मदत केंद्र अहिल्यानगर) विराज गिरे साहेब (सहाय्यक उपनिरीक्षक अहिल्यानगर) रामदास ताटे सहेब खरेदी विक्री संघ अहिल्यानगर तालुका बाबासाहेब काळे तसेच सर्व युवा ग्रामीण पत्रकार संघातील महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख व असंख्य संघटनेचे सदस्य तसेच अहिल्यानगर येथील नागरिक पुरस्कार करते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश काळे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार महाराष्ट्राचे उपराष्ट्र अध्यक्ष आदरणीय जीवन मोहिते सरांनी मानले.













