सिनेमा, मालिका चित्रीकरणासाठी साताऱ्यासाठी प्रोत्साहन धोरण आणणार सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांची घोषणा

सिनेमा, मालिका चित्रीकरणासाठी साताऱ्यासाठी प्रोत्साहन धोरण आणणार

सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांची घोषणा

सातारा, दि. 11

सातारा जिल्हा आणि परिसर हा सिनेमा, मालिकांच्या चित्रीकरणासाठी अत्यंत पोषक असून त्यासाठी धोरण तयार करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांनी आज येथे केली.

 

संघटनात्मक प्रवास आणि सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित शाहिरी महोत्सवाच्या समारोपासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री 

अ‍ॅड आशिष शेलार आज सातारा दौऱ्यावर असून आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 11 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच जिल्हा पदाधिकारी आणि सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक घेतली.  

दरम्यान, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री शेलार यांनी सांगितले की, सातारा परिसर हा ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांसह निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. या भागात सिनेमा, मालिका यांचे चित्रिकरण सध्या केले जाते. भविष्यात या परिसराला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, चित्रपट, मालिका क्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ यांना अधिक सुविधा कशा देता येतील, याबाबत एक धोरण तयार करण्यात येईल. संबंधित व्यवसायातील तज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन शासन याबाबत धोरण तयार करेल, अशी घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली. 

 

यावेळी आमदार आणि सातारा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी सभापती सुनिल काटकर, माजी आमदार मदन भोसले, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा चित्रलेखाताई माने- कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ट उपाध्यक्ष पंकज चव्हाण आदी. उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें