खेळाडूंना निवड चाचणीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

खेळाडूंना निवड चाचणीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

सातारा : केंद्र शासनाच्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यास मैदानी खेळाचे अनिवासी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रशिक्षण केंद्रांतर्गत राज्य, राष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याची कार्यवाही सकाळ व सायंकाळ सत्रात जिल्हास्तर देखरेख व नियंत्रण समिती, सातारा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या अधिपत्याखाली सुरु आहे. खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रामध्ये नव्याने खेळाडू नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु असून, निवड चाचणीचे आयोजन दिनांक १२ जून रोजी करण्यात आले आहे. तरी १० वर्षे पुर्ण ते १६ वर्षाच्या आतील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपले अर्ज दिनांक १० जूनपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे श्री. कय्युम शेख, मैदानी क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal