बोरगांव पोलिसांची दमदार कामगिरी: २ तासांत २५ लाखांच्या खंडणीप्रकरणी चौघांना ठोकल्या बेड्या

: बोरगांव पोलिसांची दमदार कामगिरी: २ तासांत २५ q111 खंडणीप्रकरणी चौघांना ठोकल्या बेड्या

सातारा: बोरगांव पोलीस ठाण्याने सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर आणि महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली २५ लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी अवघ्या दोन तासांत चार आरोपींना जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास आणि कौतुक व्यक्त होत आहे.
नागठाणे (ता. जि. सातारा) येथील एका बेकरी व्यावसायिकाला २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या परशुराम उर्फ भैय्या रविंद्र मोहीते, अमित उर्फ काळया अशोक मोहीते, रोहीत संतोष मोहीते आणि अक्षय सर्जेराव मोहीते या चौघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने नागठाणे गावच्या कमानीजवळून ताब्यात घेतले. पाचवा आरोपी साहील शिकलगार हा आधीच गंभीर गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक फौजदार प्रविण शिंदे, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, दिपक मांडवे, प्रकाश वाघ, सतीश पवार, केतन जाधव, संजय जाधव आणि विशाल जाधव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी केली. सदर गुन्ह्याचा तपास स्मिता पाटील या पुढे चालवत आहेत.
बोरगांव पोलिसांनी उद्योजक आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, खंडणी किंवा दमदाटीच्या घटनांबाबत तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या कारवाईने बोरगांव पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडले असून, जनसामान्यांमधून त्यांचे कौतुक होत आहे.

सातारा: बोरगांव पोलीस ठाण्याने सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर आणि महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली २५ लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी अवघ्या दोन तासांत चार आरोपींना जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास आणि कौतुक व्यक्त होत आहे.

नागठाणे (ता. जि. सातारा) येथील एका बेकरी व्यावसायिकाला २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या परशुराम उर्फ भैय्या रविंद्र मोहीते, अमित उर्फ काळया अशोक मोहीते, रोहीत संतोष मोहीते आणि अक्षय सर्जेराव मोहीते या चौघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने नागठाणे गावच्या कमानीजवळून ताब्यात घेतले. पाचवा आरोपी साहील शिकलगार हा आधीच गंभीर गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक फौजदार प्रविण शिंदे, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, दिपक मांडवे, प्रकाश वाघ, सतीश पवार, केतन जाधव, संजय जाधव आणि विशाल जाधव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी केली. सदर गुन्ह्याचा तपास स्मिता पाटील या पुढे चालवत आहेत.

बोरगांव पोलिसांनी उद्योजक आणि लक्वaaहन केले आहे की, खंडणी किंवा दमदाटीच्या घटनांबाबत तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या कारवाईने बोरगांव पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडले असून, जनसामान्यांमधून त्यांचे कौतुक होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें