महिला सक्षमीकरणासाठी आमदार अमित गोरखेंचे पाऊल: अलका बोभाटे यांच्या कार्याला निधीचे बळ  

महिला सक्षमीकरणासाठी आमदार अमित गोरखेंचे पाऊल: अलका बोभाटे यांच्या कार्याला निधीचे बळ  

जावली प्रतिनिधी; मोहन खुडे

तासगाव, दि. 13 मे 2025: तासगाव पंचायत समितीच्या गणातून सातारा विकास आघाडीतर्फे निवडून आलेल्या सौ. अलका बोभाटे यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना आपल्या कार्यकुशलतेने तासगाव गणात विकासकामांचा ठसा उमटवला आहे. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांद्वारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बोभाटे यांच्या मागणीनुसार विकासकामांसाठी निधी देण्याचे आश्वासन विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी दिले. तसेच, जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या सामाजिक कार्याला सहकार्य करण्याची ग्वाही दिली.  

लहुजी शक्ती सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष आणि महिला आघाडीच्या पदावर बोभाटे यांनी अल्पावधीत महिलांचे मजबूत संघटन उभे केले. बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आमदार गोरखे म्हणाले,

 

यावेळी बोभाटे यांनी गोरखे यांचा सत्कार केला आणि तासगाव गणातील विकासकामांसाठी निधीची मागणी केली. गोरखे यांनी लवकरच निधी देण्याचा शब्द दिला. यावेळी तासगाव गणातील पदाधिकारी आणि लहुजी शक्ती सेनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें