साताऱ्याचे शिवशाहीर जयवंत बाबर यांना ‘राष्ट्रीय आदर्श कला गौरव पुरस्कार’ गोव्यात राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मान  

साताऱ्याचे शिवशाहीर जयवंत बाबर यांना ‘राष्ट्रीय आदर्श कला गौरव पुरस्कार’

गोव्यात राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मान  

सांखळी, गोवा, दि. 27 एप्रिल 2025: सातारा जिल्ह्यातील वेळे कामथी गावचे सुपुत्र आणि नामवंत शिवशाहीर जयवंत बाबर यांना त्यांच्या संगीत कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘राष्ट्रीय आदर्श कला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी (रजि.), बेळगावी आणि नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (रजि.), बेळगावी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविंद्रभवन, सांखळी, गोवा येथे झालेल्या या सोहळ्यात दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांतील निवडक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

जयवंत बाबर यांनी भक्ती संगीत, शाहिरी पोवाडे, लोकगीते, देवाच्या गाण्यांचे कार्यक्रम, तसेच शिवजयंती आणि भीमजयंतीसारख्या प्रसंगी विविध सांगीतिक कार्यक्रम सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. स्वतः गीतकार, संगीतकार, गायक आणि समाजप्रबोधनकार म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. यापूर्वी त्यांना पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये पद्मश्री डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते ‘कलाभूषण पुरस्कार’ मिळाला होता.

या पुरस्कार सोहळ्यात जयवंत बाबर यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल सातारा जिल्ह्यातून आनंद व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या अनेक शुभेच्छा त्यांना मिळत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें