चाळीसगाव शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे लाखोंचा गांजा जप्त

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- 

दि. ३० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी नाईट राऊंड व नाकाबंदी ड्युटीवर असताना मालेगाव रोडवरील धुळे ते छत्रपती संभाजीनगर बायपास चौफुली येथे वाहनांची तपासणी करत असतांना. पोलिसांनी पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम.एच.१२के. एन.२३०५ ही गाडी थांबवून तपासणी केली असता, त्या गाडीच्या डिक्कीमध्ये निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्यात गांजासारखा वास असलेला पदार्थ आढळून आला. याची माहिती पोलिसांनी शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना देण्यात आली, पोलिस निरीक्षक यांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले, व पुढील कार्यवायीस त्यांनी सुरुवात केली. फॉरेन्सिक पथक व पंचासमक्ष झालेल्या तपासणीत सदर पदार्थ हा अंमली पदार्थ ‘गांजा’ असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळीच शेख नदीम शेख बशीर (वय ४० वर्षे, रा. गुलवानी खालदा, गल्ली नं. ३, मालेगाव, जि. नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. सदर गांजाचे एकूण वजन ४२ किलो ५८३ ग्रॅम असून, त्याचे अंदाजित बाजारमूल्य रु. २४ लाख ६९ हजार १५०/- इतके आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरलेली गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एन डी पी एस कायदा कलम ८ (C), २०(B), २९ अन्वये चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चालु आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, व पोलीस उपअधीक्षक राजेश चंदेल, यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सदर कारवाई ही पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, योगेश माळी, कैलास पाटील, अरुण बाविस्कर, पोलीस हवालदार राहुल सोनवणे, विनोद पाटील, योगेश बेलदार, अजय पाटील, पोलीस नाईक भूषण पाटील, राकेश पाटील, नितीन आगवणे, महेंद्र पाटील, नरेंद्र चौधरी, अमोल भोसले, निलेश पाटील, नाना बच्चे, आशुतोष सोनवणे, विजू पाटील, राकेश महाजन, समाधान पाटील, दीपक चौधरी, पवन पाटील, व महिला पोलीस शिपाई सभा शेख यांनी केली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal