समतेचा संदेश: सरडे गावा मध्ये आंबेडकर जयंतीचा उत्सव”: सरडे गावात जाधव कुटुंबाचा अनोखा उपक्रम”

समतेचा संदेश: सरडे गावा मध्ये आंबेडकर जयंतीचा उत्सव”: सरडे गावात जाधव कुटुंबाचा अनोखा उपक्रम”

सरडे – सरडे गावातील ह.भ.प विजय महाराज जाधव आणि त्यांच्या पत्नी जानकी विजय जाधव सह महादेव विजय जाधव , सुवर्णा संजय जाधव, कमल सदाशिव जाधव, प्रल्हाद जाधव, संजय जाधव सह सरडे गावातील जाधव कुटुंबाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामुदायिक एकात्मतेचा संदेश देत अनोखा उपक्रम राबवून जयंती साजरी केली. भारतीय संविधानाचे जनक व समताधिष्ठित समाजनिर्मितीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैयक्तिकापेक्षा विचारमूर्ती मानणाऱ्या ह.भ.प विजय महाराज जाधव कुटुंबाने गावातील सर्व वर्ग-जातीच्या लोकांना एकत्र आणून जयंतीसाठी नवे मापदंड निर्माण केले.  

 

“डॉ. बाबासाहेब हे व्यक्ती नसून विचारप्रवाह आहेत. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केलेल्या एकात्मतेच्या प्रयत्नांना आम्ही या उत्सवात साकार केले,” असे सांगत ह.भ. प.विजय महाराज जाधव आणि त्यांचे कुटुंब स्व खर्चाने हा कार्यक्रम यशस्वी केल्याचे सांगितले. रामोशी समाजात जन्मलेल्या जाधव यांनी आंबेडकरी विचारधारेने स्वतःचे जीवन बदललेल्या अनुभवावर भर देत, “त्यांच्या शिकवणीमुळेच माझ्या जगण्याची दिशा ठरली,” असे विशद केले.  

 

या कार्यक्रमात गावातील राजकीय नेते, सरपंच, आणि स्थानिक युवकांनी भाग घेतला. जाधव कुटुंबाने दरवर्षी अशाच पद्धतीने समाजप्रबोधनाचे ध्येय साधण्याचे आवाहन केले आहे. त्यावेळी

सरडे ग्रामपंचायत सरपंच सह ग्रामपंचायत सदस्यांसह विवध मान्यवर उपस्थित होते. सरडे गावातील काही मंडळाने केलेल्या जयंती पेक्षा ही विजय महाराज जाधव यांनी केलेली जयंती कार्यक्रम म्हणजे एक गावाला समतेचा संदेश दिला मंडळाने ही या कार्यक्रमाकडे लक्ष देऊन गावातील सर्व लोक एक कसे होतील आणि गावात ऐकी निर्माण करून महामानवांचे विचार गावात सर्व युवा तरुण पिढीला पोहचवले पाहिजे यातून गावातील जास्तीत जास्त विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याकडे भर दिला गेला पाहिजे आणि गावातील सर्व लोक सर्व समाज एक होऊन गावचे नाव देशात गाजेल पाहिजे असे जाधव महाराज बोलले आहे .

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें