साक्षी हरिदास बनसोडे हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

साक्षी हरिदास बनसोडे हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मúहाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडुंना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा 455 राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 हा सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ज्युदो या क्रीडा प्रकाराची प्रशिक्षणार्थी कुमारी साक्षी हरिदास बनसोडे हिला जाहीर झाला आहे. 

साक्षी ही अत्यंत मेहनती व जिद्दी खेळाडु आहे. सन 2024 मध्ये तुर्कस्तान – कझाकस्तान येथे झालेल्या वर्ल्ड डेफ ज्युदो चॅम्पीयनशीप मध्ये भारताला पहिले कास्यपदक मिळवुन दिले आहे. तसेच दिनांक 01-12-2024 ते 08-12-2024 या कालावधी मध्ये मलेशिया येथे झालेल्या 10 वी एशियन पॅसिफीक डेफ गेम्स मध्ये ज्युदो या क्रीडाप्रकारात -57 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. साक्षी बनसोडे हिला सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील प्रशिक्षक पोशि/ 1793 दत्ता भोसले (एन. आय. एस. ज्युदो प्रशिक्षक ) व मपोशि/ 756 स्वाती जाधव यांनी अत्यंत मेहनपुर्वक व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले आहे.

 

कुमारी साक्षी बनसोडे हीस श्री सुनिल सपकाळ क्रीडा व्यवस्थापक प्रबोधिनी व्यवस्थापक, सॅम्युअल भोरे सहा. क्रीडा व्यवस्थापक / प्रबोधिनी व्यवस्थापक, पोलीस शिपाई / 1793 दत्ता भोसले (एन.आय.एस.ज्युदो प्रशिक्षक), मपोशि / 756 स्वाती जाधव (ज्युदो प्रशिक्षक) यांनी मोलाचे मार्गदर्शन व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले आहे

कुमारी साक्षी बनसोडे हिच्या यशाबद्दल साक्षीचे तसेच सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीचे प्रबोधिनी व्यवस्थापक, प्रशिक्षक यांचे उल्लेखनिय कामगिरी बाबत श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अतुल सबनीस पोलीस उप-अधीक्षक (गृह), श्री.राजु शिंदे राखीव पोलीस निरीक्षक, श्री सुनिल चिखले पोलीस उप-निरीक्षक पोलीस कल्याण व मानवी संसाधन कार्यालय सातारा यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच पुढील स्पर्धांकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें