ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुस्तक वाटप
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन तर्फे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त प्रा . गौतम निकम यांचे ‘ज्ञानदीप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ‘
पुस्तक विविध ठिकाणी सप्रेम भेट देऊन साजरी करण्यात आली. संस्थेतर्फे चाळीसगाव बसस्थानक परिसरात बसने प्रवास करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींसह ज्येष्ठ नागरिक व महिलांना पुस्तकं वाटप करण्यात आले. तसेच धुळे रोड भोरस फाट्या जवळील माऊली लॉन्स मध्ये नवरदेव नवरी वधू वरांना विवाह निमित्त पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ महामानवांचे विचार समाजात पाहिजे आणि समाजात वाचन चळवळ निर्मित व्हायला पाहिजे यासाठी संस्थेतर्फे तिथेही पुस्तके सप्रेम भेट देण्यात आली . यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी वाचन चळवळीचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य याविषयी उपस्थितांशी चर्चा केली चर्चा केली, यावेळी साप्ताहिक वंचितांचा प्रतिनिधी चे संपादक व बंजारा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक योगेश्वर राठोड व प्रा . भूषण मोरे उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल वाचक प्रेमी नागरिकांतर्फे ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.













