मध व्यवसायाचे प्रशिक्षण व साहित्य पुरवठ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सातारा दि. : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ हे राज्यातील मध व्यवसाय वाढीसाठी काम करीत असून, या मध उद्योगांतर्गत जिल्ह्यांतील आदिवासी कातकरी समाजाला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळणेसाठी आर्थिकदृष्ट्या स्थिर करणेसाठी मंडळ व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने या समाजातील लोकांना प्रशिक्षण व साहित्य पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी दिली आहे.
इच्छुकांनी अर्जासोबत जातीचा दाखला, आधार, रेशनकार्ड, बँकक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, कुंटुबांतील कोणी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे हमी पत्र जोडावे . अर्ज दि. 12 मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, प्रिती हॉटेल कॉम्प्लेक्स, अंजठा चौक, सातारा येथे कार्यालयीन वेळेत भरून देण्यात यावेत.













