दारूबंदीच्या मागणीसाठी शेरज खुर्द च्या महिला धडकल्या कोरपणा पोलीस ठाण्यावर
कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपणा तालुक्यातील शेरज. खुर्द ता.कोरपणा येथील महिला 13 फरवरी गुरुवारी दुपारी एक वाजता च्या दरम्यान गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी कोरपणा पोलीस ठाण्यावर धडकल्या.दारूबंदीच्या मागणीसाठी शेरज खुर्द च्या महिला धडकल्या कोरपणा पोलीस ठाण्यावर ग्रामपंचायतीने केला दारूबंदीचा ठराव गावात दारूमुळे होतात भांडणतंटे शेरज खुर्द.ता.कोरपणा येथील महिला गुरुवारी गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी कोरपणा पोलीस ठाण्यावर धडकल्या. महिलांसह ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन दिले.ग्रामपंचायतीने गावात दारूबंदीचा ठराव 26 जाणेवारीला केला आहे. दारूमुळे गावात भांडणतंटे होतात व कौटुंबिक वाद वाढत असल्याने दारू विक्री बंद करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली. शेरज खुर्द येथील महिला उज्वला विनायक हुलके, पुष्पाताई मोहन उराडे, अर्चना महेश गिलबिले, अर्चना अविनाश हुलके, सुनंदा सुरेश डाकरे, यशोधरा दीपक निमसटकर,शालिनी गिरधर कोठे, उज्वला रमेश चिंचोलकर, निर्गुणा भगवान राजूरकर,वंदना गणेश नींदेकर,गीता ताई जगदीश खनके, लिलाबाई निळकंठ गाताडे, जोशना दत्ता धवडे, सुमनबाई जनार्दन खनके, संगीता तेजराज बुचुंडे. स्वतः गावातील सरपंच अर्चना महेश गिलबिले महिलांसोबत उपस्थित होत्या यांच्यासह ग्रामस्थांनी गावातील अवैध दारूबंदी करण्याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन दिले होते. सरपंच अर्चना महेश गिलबिले व ग्रामसेवक यांनी समस्त गावातील नागरिकांच्या उपस्थितीत ठराव घेण्यात आला सदर या ठरावाची प्रत कोरपणा पोलीस स्टेशन यांना देण्यात आली तसेच गावातील पोलीस पाटील यांना निवेदन दिले स्वतः ग्रामस्थ त्यांना माहिती देऊन पोलीस स्टेशनला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले मात्र गावकऱ्यांच्या निमंत्रणाला दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता पोलीस पाटील यांचा फोन नॉट रिचेबल दाखवीत होता ग्रामस्थांना पोलिस स्टेशन मध्ये येतो असे सांगितले मात्र स्वतः उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांमध्ये पोलीस पाटील यांच्या कार्यशैलीवर ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला असून पोलीस पाटील शासनाचे मानधन घेतात मात्र गावातील अवैद्य व्यवसायांची माहिती पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवीत नाही असा थेट आरोप ग्रामस्थांनी पोलीस पाटलांवर केला. गावाची काय घेणेदेणे नसणारे अशा पोलीस पाटलांचा काय उपयोग? कोकणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत यांना शरद गावातील ग्रामस्थांनी व महिलांनी निवेदन दिले ग्रामस्थांच्या निवेदनावर साह्य आहे. पोलीस पाटील यांच्याबद्दल ग्रामस्थांनी ठाणेदार राजपूत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. तेव्हा कोरपणा पोलीस स्टेशन याकडे लक्ष देऊन गावातील दाखवते दारू विक्री बंद करतील काय याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. कल्पना पोलीस विभागांच्या वतीने दारू बंद न झाल्यास चंद्रपूर जिल्हा अधीक्षकांकडे समस्त गावकरी धाव घेतील असे मत येथील महिलांनी व्यक्त केले. दारू विक्री करणाऱ्या महिला कोणत्याही कारणाने गावातील नागरिकांसोबत भांडण करत आहे.दारू विक्री करणारे महिलांच्या काही अंतरावर जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत अंगणवाडी शासकीय कार्यालय असल्याने याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांवर होत आहे. या बाबींना कंटाळून अखेर शरद गावातील महिलांनी कोरपणा पोलीस स्टेशनला धडक देत निवेदन दिले.













