फलटण तालुक्यामध्ये महावितरण कंपनी मधील विद्युत कर्मचारी यांचे सुरक्षा प्रशिक्षण व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना वैद्यकीय (इ पहचान)कार्ड वाटप व आरोग्य शिबीर संपन्न.
फलटण प्रतिनिधी: महावितरण फलटण विभाग, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र सांगली , महाराष्ट्र राज्य कामगार विमा सेवा दवाखाना (ESIC) फलटण व विद्युत अप्रेंटिस सेवा सोसायटी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण विभागांमधील महावितरण कंपनी मधील विद्युत कर्मचारी यांच्यासाठी सुरक्षा प्रशिक्षण व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय (इ पहचान)कार्ड वाटप व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी
श्री. प्रदीप ग्रामोपाध्ये साहेब, कार्यकारी अभियंता, फलटण विभाग श्री महेशकुमार राऊत साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, फलटण विभाग श्री बी.आर.लोंढे साहेब अतिरिक्त कार्यकारी अभियंता, फलटण शहर उपविभाग श्री माहुलकर साहेब, उपकार्यकारी अभियंता प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र सांगली श्री कोष्टी साहेब, उपकार्यकारी अभियंता सातारा मंडल श्री प्रदीप देहरकर साहेब उपकार्यकारी अभियंता फलटण ग्रामीण उपविभाग श्री दस्तगीर शेख साहेब उपव्यवस्थापक (मानव संसाधन) फलटण विभाग
श्री डाॅ भारत नगारे प्रभारी वैद्यकीय अधिकारी ESIC दवाखाना फलटण
श्री सतिश टिळेकर अध्यक्ष आऊटसोर्सिंग कृती समिती संघटना सातारा
श्री सचिन जाधव व्यवस्थापक विद्युत अप्रेंटिस सेवा सोसायटी सांगली आऊटसोर्सिंग कृती समिती महाराष्ट्र
सर्व शाखाधिकारी फलटण विभाग , विद्युत कर्मचारी बंधूं व महीला कर्मचारी तसेच सर्व महावितरण संघटनेमधील पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दस्तगीर शेख साहेब उपव्यवस्थापक (मानव संसाधन) फलटण विभाग यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे व कर्मचारी यांचे स्वागत केले श्री महेशकुमार राऊत साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, फलटण विभाग यांनी सर्व कर्मचारी यांना कंत्राटी कामगारांचे अलीकडे अपघातात होण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्या दृष्टीने सुरक्षित काम करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
श्री माहुलकर साहेब, उपकार्यकारी अभियंता प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र सांगली यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये विद्युत सुरक्षेशी निगडित अशा कायदेशीर बाबींचा आढावा घेत वीज ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. तिच्याशिवाय आपले पान हलत नाही, पण तिचा योग्य रीतीने वापर न केल्याने मानवी सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी यांना सुरक्षित साधनांचा वापर करून सुरक्षितपणे काम करण्याचे सांगितले .
तसेच विद्युत उपकरणे सुरक्षितपणे हाताळणीबाबत, वीज सुरक्षित वापर करण्याबद्दलचे निकष, सुरक्षेच्या बाबी लक्षात घेऊन बनवले गेलेले नियम, गुणवत्ता, प्रशिक्षण, मार्गदर्शन, नियम न पाळल्यास होऊ शकणारी कारवाई, उपकेंद्र मधील लेखी परमीट बुक व फोन परमीट परवाना कसे घेऊन घेऊन काम कसे करावे अशा अनेक गोष्टींबाबत वीज सुरक्षा विषयी प्रशिक्षण दिले.श्री डाॅ भारत नगारे प्रभारी वैद्यकीय अधिकारी ESIC दवाखाना फलटण यांनी बाह्य स्त्रोत कर्मचारी यांना ई एस आय सी च्या माध्यमातून मिळणारे वैद्यकीय बेनिफिट व कॅशलेस सुविधा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सर्व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.श्री सतिश टिळेकर अध्यक्ष आऊटसोर्सिंग कृती समिती संघटना सातारा यांनी सुरक्षतेचे महत्व व सुरक्षित साधनांचा वापर करून सुरक्षित काम करण्याचे आवाहन केले .कार्यक्रमाची शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये श्री. प्रदीप ग्रामोपाध्ये साहेब, कार्यकारी अभियंता, फलटण विभाग यांनी प्रत्येक क्षेत्रात सध्या सुरक्षा हा महत्वाचा विषय ठरू लागला आहे. केवळ वीज क्षेत्रातमध्येच सुरक्षा महत्त्वाची नाही तर रोजच्या जीवनात वावरताना , मोबाईल वरती बोलत पायी चालत असताना होणारे अपघात, गाडी चालवताना होणारे अपघात कसे होतात याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. आपण आपल्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचे आहे त्यामुळे आपण काम करीत असताना सुरक्षित पणे काम करावे असे आवाहन करण्यात आले.
वीज कंपनीमधील सर्व क्षेत्रांमधील वीज बील वसुली, लाईन मेंटेनन्स या सर्व कामामध्ये प्रामुख्याने विद्युत कामगारांचा किती मोलाचा वाटाआहे हे सांगून सर्व कर्मचारी यांच्या कामाविषयी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री ननावरे साहेब यांनी सर्व पाहुण्यांचे व अधिकारी , कर्मचाऱ्यांचे आभार मानले या कार्यक्रमास फलटण तालुक्यामधील सर्व अधिकारी, पदाधिकारी , विद्युत कर्मचारी तसेच कंत्राटी कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.










