पत्रकार क्रिकेट प्रीमियर लीगचा पहिला किताब चाळीसगांव संघाच्या नावावर, अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघावर केली 29 धावांनी केली मात

पत्रकार क्रिकेट प्रीमियर लीगचा पहिला किताब चाळीसगांव संघाच्या नावावर, अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघावर केली 29 धावांनी केली मात

( चाळीसगांव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर काल झालेल्या अंतिम सामन्यात चाळीसगाव पत्रकार संघाने जळगाव प्रिंट मीडिया संघाचा पराभव करून पत्रकार प्रीमियर लीगच्या पहिल्या चषकावर आपले नाव कोरले. जळगाव येथील पत्रकारांनी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी राज्यातील अनोखी पहिली क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 18 संघ सहभागी झाले होते. 18 संघातून अंतिम दोन संघात हा अंतिम सामना झाला यातील विजेता संघ चाळीसगांव पत्रकार संघ झाला, विजेत्या संघाला भव्यदिव्य अशी ट्रॉफी देण्यात आली. झालेल्या या अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला. व चाळीसगांवच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आले त्यानुसार चाळीसगांव संघाने प्रथम फलंदाजी करून निर्धारित आठ षटकामध्ये 79 धावा केल्या आणि जळगाव प्रिंट मीडियाच्या संघाला अंतिम सामना जिंकण्यासाठी 80 धावांचे लक्ष दिले प्रस्तुतरात जळगाव संघाने आठ षटकांमध्ये 51 धावा केल्या आणि हा सामना चाळीसगावच्या संघाने 29 धावांनी जिंकला. चाळीसगांव संघाच्या विजयात कर्णधार खेमचंद कुमावत, उप कर्णधार उमेश पवार, यष्टीरक्षक मनोज गवळी, यांच्यासह महेश पाटील, रवि कोष्टी, गफार मलिक, आनंद गांगुर्डे, रोहित शिंदे, रणधीर जाधव, दर्शन गुरव, आकाश कोळी, विजय पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. त्याच प्रमाणे सोजीलाल हडपे, उमेश गवळी, ललित गवळी, यश पाटील, यश कुमार रणधीर यांनी संघाला बाहेरून पाठिंबा दिला. हा अंतिम सामना पाहण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधिक्षक नखाते साहेब, जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अतिशय रोमहर्षक झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन विजेता संघाचे अभिनंदन करण्यात आले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें