लोणंद येथे भव्य उद्घाटन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन
खा. पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन .
खास आकर्षण
जगातील सर्वात बुटकी म्हैस
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
लोणंद येथे दि 1ते 5 फेब्रुवारी 2025 या कालवधीत पालखीतळ येथे शरद कृषी महोत्सव या राज्यस्तरीय 250 स्टॉलच्या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे 6 वे वर्ष आहे. या शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व शेतकरी मेळावा रविवार दि.2 रोजी सकाळी 10 वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते, मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे, अशी माहिती शरद कृषी महोत्सवाचे निमंत्रक डॉ. नितीन सावंत यांनी दिली.
लोणंद पालखीतळावर येथे पाच दिवसाचे भव्य उद्घाटन शेतकरी मेळावा, औद्योगिक, पशुपक्षी, प्रदर्शन होणार असून यामध्ये अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी संशोधन, पीक स्पर्धा, कृषी अवजारे, पशुपक्षी प्रदर्शन, यंत्रे वाहाने, अवजारे, औद्योगीक आदीचे सुमारे २५० स्टॉल सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचा प्रारंभ शनिवार 1 रोजी सकाळी 9 वाजता शाळेतील मुलीच्या कृषीदिंडीने होणार आहे.













