एसटी भाडे वाढ विरोधात शिवसेनेचे राज्यात निदर्शने, चाळीसगावात मात्र शांतता, उन्मेष पाटील यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष

एसटी भाडे वाढ विरोधात शिवसेनेचे राज्यात निदर्शने, चाळीसगावात मात्र शांतता, उन्मेष पाटील यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

राज्यात एसटीची पंधरा टक्के भाडे वाढ झाल्याने त्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यात सर्वत्र जोरदार आंदोलन निदर्शने चालू आहे, मात्र चाळीसगाव तालुक्यात असे आंदोलन निदर्शने करतांना शिवसेने कडून काही बघायला मिळत नाही, मुळातच आंदोलने निदर्शने करणे ही शिवसेनची ओळख आहे, आणि जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय असतांना देखील चाळीसगाव तालुक्यात मात्र शिवसेने कडून कोणतीच निदर्शने किंवा आंदोलन जनतेसाठी होत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकसभेपूर्वी भाजप मधून शिवसेनेत गेलेले उन्मेष पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्ह्याचे नेते मानले जातात,शिवसेनेत आल्या नंतर निवडणुकीपूर्वी विविध आंदोलन करून आपल्या कडे जनतेला आकर्षित करण्याचे कार्य पाटील यांनी केले होते ते जनतेच्या हितासाठी होते की स्वाहीतासाठी असा प्रश्न आज शांत असलेल्या पाटील यांना पाहिल्यास मनात उभा राहतो आणि त्यांच्या कडे जिल्ह्याचे नेते म्हणून पाहत असल्याने शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना अशीच काहीशे निदर्शने किंवा आंदोलन करण्याच्या संदर्भात मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्याच्या नेत्याकडून आदेशाची वाट पहावी लागत असल्याची चर्चा देखील ऐकायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकी नंतर शिवसेनेचे महत्वाचे जिल्ह्याचे नेते उन्मेष पाटील हे कुठल्याच राजकीय किंवा सामजिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतांना दिसत नसल्याने शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या नेत्याच्या मनात काही वेगळं तर चालू नाही ना अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें