‘निमा – चाळीसगाव, मॅरॅथॉन स्पर्धा 2025’ उत्साहात संपन्न…
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
सर्व समाजाचे आरोग्य सांभाळणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांनी स्वतःच्या आरोग्य संदर्भात देखील तितकेच जागरूक राहून “तंदुरुस्त शरीर व चुस्त मन” ठेवण्याचा संकल्प केला. आणि याची सुरुवात म्हणूनच, ‘ निमा – नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. रन फॉर हेल्थ’ चा नारा देऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजन करण्यात आली, या मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण प्राप्त करणाऱ्या के. डी .एम .जी. आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते .
मॅरेथॉन ची सुरुवात धुळे रोड येथील महाराणा प्रताप चौकातून आयुर्वेद महाविद्यालयाचे संचालक, डॉ. हरिष महाजन यांनी स्पर्धक धावपटूंना निशान दाखवून केली. मालेगाव रोड पर्यंतचे अंतर धावपटूंनी पार करून तेथे मॅरेथॉनची सांगता झाली. सदर मॅरॅथॉन मध्ये डॉक्टरांच्या पुरुष गटात डॉ. सुजित वाघ आणि डॉ. पुष्कर घाटे दोघांनी प्रथम क्रमांक, डॉ. प्रदीप अहिरराव यांनी द्वितीय तर डॉ. प्रवीण भोकरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला डॉक्टरांच्या गटात डॉ. तेजस्विनी पोदार यांनी प्रथम आणि डॉ. समिता घाटे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांपैकी मुलांमधून महेश खांडेकर प्रथम, चेतन खांडेकर द्वितीय, अरविंद जाधव तृतीय, तर मुलींमधून मोनिका वाघमोडे हिने प्रथम, करून चव्हाण द्वितीय आणि ज्ञानेश्वरी जाधव ने तृतीय क्रमांक पटकावला. ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्य आयोजक निमाचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न अहिरे, सचिव डॉ. केतन वाघ, कोषाध्यक्ष डॉ. नितीन साळुंखे व इतर सर्व सन्माननीय निमा सदस्यांनी परिश्रम घेतले.













