नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनची नूतन कार्यकारणी जाहीर

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनची नूतन कार्यकारणी जाहीर

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन चाळीसगाव शाखेची नूतन कार्यकारणी मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच जाहीर करण्यात आली. दि.२६ जानेवारी रोजी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण ह्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील हॉटेल कमलशांती पॅलेस या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात ही कार्यकारणी घोषित करण्यात आली. यामध्ये नूतन अध्यक्ष म्हणून डॉ. प्रसन्न अहिरे तर सचिव डॉ. केतन वाघ, कोषाध्यक्ष डॉ. नितीन साळुंखे, उपाध्यक्ष डॉ. समीर धाकड, सहसचिव डॉ. सारंग पाटील, डॉ. स्वप्नील शिंदे, डॉ. प्रशांत धामणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी प्रमुख म्हणून डॉ. संजय पाटील, डॉ. सोपान खर्चे, डॉ. योगेश पाटील, डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें