सातारा डीसीसी बँकेत भारत पर्व देशभक्तीपर गीत नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

सातारा डीसीसी बँकेत भारत पर्व देशभक्तीपर गीत नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

सातारा प्रतिनिधी; सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र भारत पर्व या हिंदी व मराठी देशभक्तीपर गायक गीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम 26 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृह जिल्हा परिषद सातारा समोर या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री एडवोकेट ना.आशिष शेलार यांची असून, श्री विकास खारघे मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव तथा अप्पर मुख्य सचिव संस्कृती कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये भार्गव कांबळे,प्रदीप जिरगे, मंदार कदम,शिवाजी सुतार,यशपाल देवकुळे, वैदही जाधव, वेदर सोनुले असे नामवंत गायिका सहभागी होणार असून सतीश कुलकर्णी यांच्या निवेदनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी संगीत संयोजन महेश सोनुले वेदा सोनुले यांनी केले आहे.तर नृत्य आविष्कार चंद्रकांत पाटील आणि समुह यांचा आहे. सदर कार्यक्रमासाठी सातारकरांनी उपस्थिती दाखवावी असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनायाचे संचालक श्री विभूषण चौरे यांनी केली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें