MH 11 मेलडी मेकर्स ग्रुपच्या संगीत मैफिलिस प्रतिसाद  विशाल अँटिक यांच्यासह सर्वच नवगायकांनी जिंकली उपस्थितांची मने  माईकच्या खरेदीतून उदयास आलेला कलाकारांच्या समूहाचे कौतुक

MH 11 मेलडी मेकर्स ग्रुपच्या संगीत मैफिलिस प्रतिसाद 

विशाल अँटिक यांच्यासह सर्वच नवगायकांनी जिंकली उपस्थितांची मने 

माईकच्या खरेदीतून उदयास आलेला कलाकारांच्या समूहाचे कौतुक

सातारा / प्रतिनिधी : सातारा येथील देवी चौकातील विशाल अँटिक शॉपीतून विक्री झालेल्या कराओके माईकच्या माध्यमातून संगीतात अभिरुची असणाऱ्या नवगायकांना एकत्रित करून सुरू झालेल्या MH 11 मेलडी ग्रुपच्या संगीत मैफिलीच्या नुकताच झालेल्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

    सातारा येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये हा कराओके गीत गायनाचा कार्यक्रम झाला. विशाल निकम यांचे देवी चौकात विशाल अँटिक शॉपी हे वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंच्या विक्रीचे दुकान आहे. तेथे कराओके सिस्टीमचे माईकसुद्धा विक्रीस उपलब्ध आहेत. विशाल निकम यांना गायनाची आवड असल्याने त्यांनी आपणाकडून माईक विकत घेणाऱ्या संगीतप्रेमी ग्राहकांना एकत्रित केले व दुर्गा राजपुरोहित यांच्या सहकार्याने MH 11 मेलडी ग्रुपची स्थापना केली. अवघ्या दोन ते तीन महिन्यात या ग्रुपच्या माध्यमातून सर्व संगीतप्रेमी एकत्रित आले व त्यांनी नुकताच गीत गाण्याचा कार्यक्रम सादर केला. साताऱ्यातील सुप्रसिद्ध गायक हेमंत गिरी, संतोष जिरेसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रुपने या संगीत विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्यासह पल्लवी शहा, साक्षी साठे, शुभांगी गुरव, अनुपमा जमदाडे, जयेश देटे, संतोष जाधव, अशोक निकम, विकास नलावडे, संस्कृती खांडके, चेतन भडकमकर, संदेश कांबळे आदींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. 

विशाल अँटिक यांनी बहारदार सूत्रसंचालन करून आणि विनोदी किस्से सांगून या कार्यक्रमात रंगत आणली. यांच्यासह सर्वच कलाकारांना माध्यमातून नवा संस्कृती म्हणजेच साताऱ्यात उदयास आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच विशाल यांच्या निवेदन शैलीचे कौतुक करून अनेकांनी त्यांना या क्षेत्रात उज्वल भवितव्य असल्याचे सांगितले. तसेच सर्वच कलाकारांनी उत्तम गीत गायनाचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

 साताऱ्यातील विविध प्रसिद्ध ठिकाणांची नावे असणारे सादर करून विशाल अँटीक यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal