सौरऊर्जा प्रशिक्षणाचा मोफत लाभ घ्यावा. 👉 स्वयंरोजगार आणि नोकरी मिळण्याची संधी.

सौरऊर्जा प्रशिक्षणाचा मोफत लाभ घ्यावा. 👉 स्वयंरोजगार आणि नोकरी मिळण्याची संधी.

गडचिरोली/ प्रतिनिधी दि. ४/१/२०२५ :- गुरुदेव बहुउद्देशीय विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालीत डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र आरमोरी येथे सौरऊर्जा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. अलीकडच्या काळात कमी खर्च आणि शुद्ध उर्जेचा पर्याय म्हणून सौरउर्जेकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेकजण सोलर प्लांट (Solar Plant) लावण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, यासाठी नेमका किती खर्च येतो आणि काय करावे लागते, याविषयी बऱ्याच जणांना माहिती नसते.
घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट घ्यायचा . किती किलो वॅटचा सोलर प्लांट लागेल , किती वीज लागते यावर अवलंबून आहे. घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट लागेल. किती वीजेची निर्मिती होते?
अनुदान मिळते का? किती अनुदान मिळणार,
सौरउर्जेचा प्लांट लावण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. केंद्र सरकार यासाठी 20 टक्के तर प्रत्येक राज्यानुसार अनुदानाचे वेगवेगळे नियम आहेत. महाराष्ट्र हे विज निर्मिती करण्यात आघाडीवर आहे. देशात निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या पंधरा टक्के विज निर्मिती महाराष्ट्रात होते तरीही विज निर्मिती पेक्षा अधिक मागणी असल्याने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील जनतेला विज टंचाईचा सामना करावा लागत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र आरमोरी येथे ४५ दिवस चालणाऱ्या सौरऊर्जा प्रशिक्षणात विज निर्मिती प्रकल्प, उपकरणे, दुरुस्ती, शोध, बांधकाम, सिद्धांत , उत्पादन, माड्यूल्स, विविध वैशिष्ट्ये, पॅनल कनेक्शन, करंट , वायरिंग, सर्किट, स्टोरेज यांसारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तरी दहावी पास असलेल्या १६ ते ४० वयोगटातील युवक युवतींनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडून नांव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी योगिता ताई अलोने मोबाईल क्रमांक 7240028767 / 7767989965 या क्रमांकावर संपर्क साधावा.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें