संभाजी सेनेच्या वतीने सावित्रीमाई फुले जयंती साजरी करून, मान्यवरांच्या हस्ते संभाजी सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले

संभाजी सेनेच्या वतीने सावित्रीमाई फुले जयंती साजरी करून, मान्यवरांच्या हस्ते संभाजी सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले

 

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-

दिनांक ३ जानेवारी रोजी संभाजी सेनेच्या वतीने सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य प्रा.डॉ.साधना निकम, मेहूणबारे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.वैदेही करंबळेकर, आई फाऊंडेशनच्या डॉ.चेतना कोतकर, व्याख्यात्या जयश्री रणदिवे, जेष्ठ शिक्षिका दिपाली परदेशी, करणी सेनेच्या सुवर्णा राजपूत, समाज सेविका उज्वला निकम, संभाजी सेनेच्या प्रदेश सल्लागार ॲड.आशा शिरसाठ, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, ग्रामविकास अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव निकम आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेळी प्राचार्य साधना निकम, जयश्री रणदिवे, चेतना कोतकर, संजीव निकम यांनी मनोगत व्यक्त केले. वाचनसंस्कृती जोपासणे पुरूषांनी स्त्रियांनी ज्योतिबा व सावित्रीच्या वसा जीवन कृतीत उतरविणे आवश्यक असून, समान राजकीय सामाजिक स्वातंत्र्य मिळणे आवश्यक असल्याचा सूर प्रमुख वक्त्यांच्या विचारातून निघाला. कार्यक्रमाच्या औचित्याला अनुसरून गायक रवींद्र निकम यांनी सावित्रीमाई फुलेंच्या जीवनावर सुंदरसे गीत सादर केले. यावेळी संभाजी सेना दिनदर्शिकेचे देखील प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मंदार करंबळेकर, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल, बापजी हॉस्पिटलचे डॉ. संदीप देशमुख, मीना गायकवाड, नगरसेविका सायली जाधव, वसुधा राजपूत, अरुणा घोरपडे, शिक्षिका ज्योती मोरे, नंदा गवळी, मुन्नाताई देशमुख, पूनम पाटील, पूजा काकडे, देवका राजपूत, साधना अनास्था, माळतकर शिरसाठ, सविता कुमावत, नगरसेवक प्रभाकर चौधरी, चंद्रकांत तायडे, रामचंद्र जाधव, रोशन जाधव, दीपक पाटील, तसेच शिवसेना (उ बा ठा) चे भीमराव नाना खलाने, दिलीप घोरपडे, महेंद्र जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते दिनेश मोरे, महेंद्र बिराडे, मेहुनबारे वि का सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र महाजन, प्रदीप देशमुख, प्रशांत गायकवाड, खुशाल बीडे, खुशाल पाटील, गजानन मोरे, चंद्रकांत ठाकरे, भगवान रोकडे, संजय सोनवणे, शाम ठाकुर, दीपक पवार, देवेश पवार, मुकेश केतकर, दीपक देशमुख, मनोज भोसले, कबीर फाऊंडेशनचे स्वप्नील जाधव, प्राध्यापक रमेश आवटे, अजय जोशी, आरिफ शेख, बाळासाहेब खरटमल, गोविंदा चौधरी, इंजि. निलेश महाजन, दीपक देशमुख, अशोक चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थिती पत्रकार आर. डी. चौधरी, एम. बी. पाटील, मुराद पटेल, जिजाबराव वाघ, सूर्यकांत कदम, रामलाल चौधरी, सुनील राजपूत, राकेश निकम, पराग सोनार, अर्जुन परदेशी, आनंद गांगुर्डे, भुरण घुले, आनन शिंपी, बबलू अहिरे, गफ्फार शेख, शार्जील खाटीक, निलेश परदेशी, यांच्या देखील पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीते प्रदेश संघटक सुनील पाटील, तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, शहराध्यक्ष आबासाहेब सौंदाणे, उद्योग विकास आघाडीचे अविनाश काकडे, तालुका उपाध्यक्ष प्रवीण पाटील, विठ्ठल राजपूत, सचिन जाधव, रवींद्र शिनकर, लक्ष्मण बनकर, भूषण पाटील, नामदेव पाटील, आधार महाले, बापूराव पाटील,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. आशा गोरे, यांनी केले तर सूत्रसंचालन पर्यावरण मित्र शालिग्राम निकम यांनी केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें