क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आद्य प्रेरणास्त्रोत : आमदार सचिन पाटील
फलटण :
क्रांतिज्योती सवित्रीमाई यांनी महात्मा फुले यांच्या बरोबर स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य तमाम स्त्रियांसाठी आजही आद्य प्रेरणास्त्रोतच आहे फुले दाम्पत्यांचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रातले कार्य आज इतक्या वर्षांनी देखील स्त्रियांसाठी ऊर्जा देणारे ठरते असे मत संत सावतामाळी मंदिर येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केले महात्मा फुले जयंती उत्सव समिती व क्रांतीज्योती सावित्रीमाई जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून त्यांच्या १९४ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी जयंती उत्सव समितीचे प्रमुख गोविंद भुजबळ, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा चे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक राजेंद्र बोराटे , समता परिषद फलटण चे अध्यक्ष बापुराव शिंदे, बाळासाहेब ननावरे संत सावतामाळी मंदिर ट्रस्ट चे संचालक विजय शिंदे ,रणजित भुजबळ विकास नाळे राहुल शिंदे वैभव नाळे किरण बोळे अतुल फरांदे दत्ता नाळे ,रोहन शिंदे ,सिद्धेश भुजबळ माधुरी भुजबळ ,सुजाता शिंदे रोहिणी कचरे हिराबाई भुजबळ मेघा भुजबळ किरण राऊत संदीप नेवसे बंडू शिंदे ज्योतिबा घनवट इत्यादी मान्यवर उपस्थित होते
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले याची जयंती रक्तदान शिबिर घेऊन दरवर्षी साजरी केली जाते जयंती उत्सव समिती तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात नायगाव येथे होणाऱ्या जयंती कार्यक्रमास शेकडो महिला उपस्थित राहणार असल्याचे गोविंद भुजबळ यांनी सांगितले











