माळजाई मंदिरात त्रिपुरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी..

माळजाई मंदिरात त्रिपुरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी..

दोन वर्षांपासून सुरू असलेली दीपोत्सवाची परंपरा यंदाही कायम; दिव्यांच्या प्रकाशाने माळजाई मंदिर परिसर उजळला

फलटण : त्रिपुरी पौर्णिमेचा पवित्र सण मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी माळजाई मंदिर व उद्यान परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. माळजाई मंदिर व उद्यान समिती आणि इनोव्हेटिव्ह इंग्लिश अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दीपोत्सवात फलटण शहर व परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला भाविक, तरुण वर्ग आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गेल्या दोन वर्षांपासून माळजाई मंदिर परिसरात त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. यंदाही ही परंपरा कायम राखत सायंकाळी मंदिर परिसरात दीपप्रज्वलन करण्यात आले. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाला. भाविकांच्या उपस्थितीमुळे उत्सवाला विशेष उत्साह आणि मंगलमय वातावरण लाभले.

त्रिपुरी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो. भगवान शंकराच्या विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी दीपप्रज्वलन करण्याची परंपरा आहे. अंधकारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय हा या दीपोत्सवाचा संदेश आहे.

या उत्सवात लायन्स क्लब ऑफ फलटणचे अध्यक्ष लायन श्री.रणजीत बर्गे, सचिव लायन श्री.प्रमोद निंबाळकर, इनोव्हेटिव्ह इंग्लिश अकॅडमीचे श्री.श्रीकांत सुर्वे सर, माजी प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर, लायन श्री.महेश गरवालीया,लायन श्री.स्वीकार मेहता, माजी प्राचार्य श्री.रवींद्र येवले, रोटरी क्लब फलटणचे प्रा.श्री.अरुण इंगळे, दिशा अकॅडमीचे श्री.सागर जाधव सर आकांक्षा क्लासेसचे श्री संजय जाधव सर,जेष्ठ नागरिक संघाचे श्री.नारायण आप्पा नलावडे, ब्राह्मण महासंघाचे शास्त्री साहेब, इनोव्हेटिव्ह इंग्लिश अकॅडमीचे दिशा अकॅडमी व आकांक्षा क्लासेसचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच फलटण शहर व परिसरातील नागरिक, महिला भाविक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांच्या सहभागातून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही उत्साहात साजरी झाली. दीपोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपत सामाजिक एकोपा आणि सामूहिक सहभागाचा सुंदर संदेश देण्यात आला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal