सुरवडी बोगद्यात ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक; वाहतूक नियमांचे उल्लंघन वाढले

सुरवडी बोगद्यात ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक; वाहतूक नियमांचे उल्लंघन वाढले

फलटण (प्रतिनिधी)

सुरवडी (ता. फलटण) येथील बोगद्यात विरुद्ध दिशेने (रॉंग साईडने) येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना आज (दि. २४ नोव्हेंबर) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार सुदैवाने बचावले असून दुचाकीचा इंडिकेटर फुटून नुकसान झाले आहे.

संबंधित दुचाकीस्वाराने दिलेल्या माहितीनुसार, ते कामासाठी कंपनीकडे जात असताना बोगद्यातून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने एक पांढऱ्या रंगाची कार आली. दुचाकीस्वाराने आपली गाडी जागेवर थांबवली, मात्र कारचालकाचे लक्ष नसल्याने त्याने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर नुकसान भरपाई मागितली असता, कारचालकाने चूक मान्य न करता अरेरावीची भाषा वापरून तेथून निघून गेल्याचा आरोप दुचाकीस्वाराने केला आहे. सुरवडी बोगद्यात विरुद्ध दिशेने वाहने चालवण्याचे प्रकार वाढले असून, वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal