कोरपणा येथे मतदार यादी प्रसिद्ध; त्रुटी असल्यास वेळेत हरकती नोंदवाव्यात — काँग्रेस तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे यांचे नागरिकांना आवाहन

कोरपणा येथे मतदार यादी प्रसिद्ध; त्रुटी असल्यास वेळेत हरकती नोंदवाव्यात

— काँग्रेस तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे यांचे नागरिकांना आवाहन

​कोरपणा (तालुका प्रतिनिधी):

कोरपणा तालुक्यातील मतदारांची अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीत नाव चुकीचे असणे, नाव वगळले जाणे किंवा अन्य कोणतीही त्रुटी आढळून आल्यास संबंधित नागरिकांनी प्रशासनाकडे वेळेत हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन काँग्रेसचे कोरपणा तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

​लोकशाही प्रक्रियेत मतदार यादी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपले नाव समाविष्ट आहे की नाही, तसेच नाव, पत्ता आणि इतर व्यक्तिगत तपशील अचूक आहेत का, याची तात्काळ खात्री करून घेणे गरजेचे आहे. यादीत कोणतीही चूक किंवा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित महसूल व निवडणूक प्रशासनाकडे वेळेत दुरुस्ती अर्ज अथवा हरकत दाखल करावी.

​”तालुक्यातील एकही पात्र मतदार आपल्या पवित्र मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये आणि मतदार यादीतील सर्व त्रुटी वेळेत दूर व्हाव्यात, यासाठी नागरिकांनी स्वतः जागरूक राहून यादीची पाहणी करावी व वेळेत हरकत नोंदवावी,” असे उत्तमराव पेचे यांनी स्पष्ट केले.

​तालुक्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घेऊन आपली नावे मतदार यादीत योग्य रीतीने नोंदवून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले

आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें