परिचारिकांनी संघटीत राहून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. 

परिचारिकांनी संघटीत राहून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. 

👉 माजी जिल्हाध्यक्षा श्रीमती माया सिरसाठ यांचे आवाहन.

👉 महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची जिल्हा कार्यकारिणी घोषित. 

गडचिरोली / प्रतिनिधी दि. २१/९/२०२६:- महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना ( रजिस्टर नंबर 3130..) गडचिरोली यांची जिल्हास्तरीय आमसभा गडचिरोली पंचायत समिती सभागृहात पार पडली. रंजना ताई कोहपरे.. महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना राज्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह गडचिरोली येथे अत्यंत पारदर्शक रित्या, नियोजनबद्ध सुरळीत पार पडली. यावेळी आमसभेचे उद्घाटक रतन शेंडे जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद महासंघ गडचिरोली, प्रमुख पाहुणे म्हणून कविताताई बोंद्रे महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना कार्याध्यक्ष, श्रीमती मायाताई शिरसाट माजी जिल्हा परिषद नर्सेस संघटना अध्यक्ष, अमिता ताई नागदेवते जिल्हा परिषद नर्सेस संघटना सहसचिव चंद्रपूर, सुलोचना ताई शिरभाते मार्गदर्शक, मुनीश्वर बोरकर साहेब संपादक वैनगंगा पुकार , चक्रधर मेश्राम राष्ट्रीय अनुसूचीत जाती जनजाती विकास परिषद जिल्हा महासचिव , खुशाल नेवारे जिल्हा कोषाध्यक्ष ग्रामसेवक संघटना गडचिरोली, कवीश्वर बनपूरकर जिल्हा अध्यक्ष ग्रामसेवक संघटना उपस्थित होते. आमसभेला उपस्थित असलेल्या पदाधिकारी व सदस्यांच्या मते लिखित घटनेनुसार जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठित करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद नर्सेस संघटना (रजिस्टर नंबर 3130) च्या अध्यक्ष पदावर मंगलाताई चंदनखेडे, सचिव पदावर शर्मिला जनबंधू, मानद अध्यक्ष नीलूताई वानखेडे, कार्याध्यक्ष छायाताई मानकर , कोषाध्यक्ष कमलताई नगराळे यांना नियुक्त करण्यात आले. या कार्यक्रमात सेवानिवृत सत्कारमूर्ती आरोग्य सेविका भगिनींचे साडी, शाल देऊन सत्कार करून पुढील आरोग्यमयी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला जनबंधू, कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमल नगराळे, आणि आभार प्रदर्शन मंगला चंदनखेडे यांनी केले .या आमसभेला बहुसंख्येने उपस्थित सर्व कोणात्याही धमक्यांना, खोट्या प्रलोभनाला बळी न पडता खंबीर विचाराने , संघटनेशी (३१३०) एकनिष्ठ असणाऱ्या आरोग्य सेविका भगिनींचे मनपूर्वक स्वागत,अभिनंदन करण्यात आले. अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या जिल्हा सचिव शर्मिला जनबंधू यांनी दिली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें