
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या सर्व समुदायातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार.
👉 संविधानिक आणि कायद्यानुसार या घटकांच्या हक्कांचे व संरक्षणात्मक उपायांचे रक्षण करणे आमचे कर्तव्य.
👉 नवनियुक्त गडचिरोली जिल्हा महासचिव चक्रधर मेश्राम यांचे प्रतिपादन.
गडचिरोली / प्रतिनिधी दि. २०/९/२०२६ :- अनुसूचित जाती जमाती समुदायातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषद नवी दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सतत प्रयत्नशील राहणार. एससी एसटी समाजातील घटकांवर होणाऱ्या अन्यायाची चौकशी करणे आणि विकासाच्या योजनांवर देखरेख ठेवणे हे कर्तव्य आहे. महत्त्वाची घटनात्मक संरक्षणाची पाहणी करून संविधान आणि इतर कायद्यांतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींना (ST) मिळालेल्या संरक्षण आणि हक्कांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आयोगाचे नवनियुक्त गडचिरोली जिल्हा महासचिव चक्रधर मेश्राम यांनी व्यक्त केले.
विविध प्रकारच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्राप्त झालेल्या विषयांची प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास करुन अनुसूचित घटकांचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे मतही जिल्हा महासचिव चक्रधर मेश्राम यांनी यावेळी व्यक्त केले. अनुसूचित जाती जमाती समुदायातील नागरिकांचे हक्क, अधिकार हिरावून घेतल्या गेल्यास किंवा त्यांच्यावर अन्याय झाल्यास प्राप्त झालेल्या व
तक्रारींची स्वतःहून चौकशी करण्यासाठी तत्परतेने कारवाई केली जाईल . तसेच विकास योजनांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या धोरणनिर्मिती व नियोजन प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेऊन विविध विकास कामे करणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले . आपल्या निवडीचे श्रेय आयोगाचे राष्ट्रीय महासचिव माजी आमदार डॉ.देवराव होळी, प्रदेश अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य डॉ. नरेंद्र विश्वनाथ उंदीरवाडे आणि प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य अमोल कुळमेथे , जिल्हा उपाध्यक्ष हंसराज उराडे यांना दिले.
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद, नवी दिल्ली (NCSC/NCST Commission, Govt. of India संबंधित) शाखा गडचिरोली च्या वतीने आयोजित सहविचार सभा आज सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली.
या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय महासचिव डॉ. देवराव होळी यांचे मार्गदर्शन लाभले. तर प्रदेश अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य डॉ. नरेंद्र विश्वनाथ उंदीरवाडे आणि प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य अमोल कुळमेथे हे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली, संघटन विस्तार व कार्यकारिणीची रचन , समाजाच्या प्रमुख समस्या व उपाययोजना , शासकीय योजना व त्यांचा लाभ SC/ST समाजापर्यंत पोहोचवणे, शिक्षण, रोजगार व कौशल्य विकास या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी हंसराज उराडे,
, प्रकाश पुणेकर, रोहिदास बोदेले, चेतन काटेगे तालुका अध्यक्ष कुरखेडा, ,सावन चिखराम, योगेश कुमरे, देवानंद बारई, मिलिंद अंबादे, अश्विनी मडावी, वंदना पुसराम, उर्मिला पोगुलवार, रुपाली दुधबावरे, नरेश पोरेटी, गणेश कचलाम, पितांबर हररो, कल्पना नरोटे, अश्विनी आत्राम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेचा विस्तार प्रत्येक गावापर्यंत करून SC/ST समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा संकल्प करण्यात आला.












