दारु पिण्याची व्यवस्था करणा-या अवैध हॉटेल, ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. 

दारु पिण्याची व्यवस्था करणा-या अवैध हॉटेल, ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. 

सातारा प्रतिनिधी:

मा.डॉ.विजय सुर्यवंशी, आयुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. सुनील चव्हाण संचालकसो, मा.विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रविंद्र आवळे, अधीक्षकसो, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या नेतृत्वाखाली दारु पिण्याची बेकायदेशीररित्या व्यवस्था करणा-या हॉटेल, ढाबा तसेच खानावळी यांच्यावर कारवाईची विशेष मोहिम सुरु दिनांक २८/१२/२०२४ हॉटेल स्वाद, सैदापूर ता. जि. सातारा या हॉटेलवर अचानक छापे टाकून कारवाई हॉटेल मालक यांच्यावर हॉटेलच्या जागेत परमिटरुम बिअरबार परवाना नसताना देखील बेकायदेशीर दारु पिण्याची व्यवस्था केल्याबद्दल महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम १९४९ मधील नियम ६८(अ)(ब) नुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याठिकाणी दारु पिण्यासाठी उपस्थित असणारे दोन इसमानवर देखील महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम १९४९ मधील नियम ८४ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

सदर कारवाईमध्ये सर्वश्री निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, श्री. सोमनाथ माने, सहा.दु.निरीक्षक पांडूरंग कुंभार, जवान सागर आवळे, अजित रसाळ, मनिष माने, अरुण जाधव, राणी काळोखे, आबासाहेब जानकर यांनी सहभाग घेतला.

जिल्हयातील हॉटेल व्यावसायिक यांना आवाहन करण्यात येते की, दि. ३१ डिसेंबर रोजी नुतन वर्षे मोठया उत्साहाने सादर केले जातात. जिल्हयातील पर्यटन स्थळी पर्यटकांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून येते त्यामुळे हॉटेल व्यावसायिक पर्यटकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवित असतात अशावेळी कार्याक्रमामध्ये ब-याच वेळा जिल्हयातील हॉटेल व्यवसायिक मद्य वितरणाकरिता एकदिवसीय तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती (Temporary One Day Function License) FL-IV मंजूर करुन न घेता कार्यक्रमाच्या दिवशी विविध प्रकारचे विदेशी मद्य, बिअर व वाईन हॉटेल परिसरात वितरण, साठा तसेच मद्य पिण्याची व्यवस्था केल्याचे तपासणी वेळी यापुर्वी निर्दशनास आलेले आहे तरी हॉटेल मालक, चालक, हॉटेल व्यवस्थापन किंवा हॉटेल मधील पर्यटक यांनी शासनाच्या आदेशाचा भंग केल्यास त्यांचे विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (९),६८, ७२, ७३, ७४, ७५, ८३, ८४, ९० नुसार कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येईल सदर गुन्हयात ३ ते ५ वर्षाचा तुरुंगवास किंवा २५,००० ते ५०,००० रुपये पर्यंत द्रव्य दंडाच्या शिक्षेची तरतुद आहे याची नोंद घ्यावी असे निर्देश श्री. रविंद्र आवळे, अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें