लोणंद येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणंद पोलिसांची शांतता समिती बैठक संपन्न

लोणंद येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणंद पोलिसांची शांतता समिती बैठक संपन्न

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे 

          लोणंद,दिनांक ३ सप्टेंबर २०२६ : आगामी गणेशोत्सव शांततेत,शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा,तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी

 

      यासाठी लोणंद पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली शांतता समितीची बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

 

       अमृता मंगल कार्यालय,लोणंद येथे झालेल्या या बैठकीस गणेश मंडळांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष,सरपंच,पोलीस पाटील,शांतता समितीचे सदस्य तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

         यावेळी प्रिंट मीडियासह डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

     गणेशोत्सवाच्या काळात घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

 

        बैठकीत गणेशोत्सवाच्या काळातील कायदा व सुव्यवस्था,मिरवणूक मार्ग,ध्वनिक्षेपकाचा वापर,वाहतूक व्यवस्था,गणेश मंडळांनी घ्यावयाची खबरदारी आणि सामाजिक सलोखा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

       गणेशोत्सव काळात नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी,कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे,असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

 

      “गणरायाचा उत्सव जल्लोषात साजरा करा; मात्र शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा कायम ठेवा,असा संदेश यावेळी देण्यात आला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें