व्यसनमुक्तीसाठी नाशिकमध्ये समाजप्रबोधनाचा जागर !  “तुमची इच्छाशक्ती हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे!” — समाजसुधारक अमोलभाऊ भागवत.

व्यसनमुक्तीसाठी नाशिकमध्ये समाजप्रबोधनाचा जागर ! 

“तुमची इच्छाशक्ती हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे!” — समाजसुधारक अमोलभाऊ भागवत.

नाशिक प्रतिनिधी: सचिन देवरे

व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारी आयुष्ये आणि भरकटणारी तरुण पिढी वाचवण्यासाठी नाशिकच्या मोक्ष फाउंडेशन येथे व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, स्वराज्य ग्रुप आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या पुढाकारातून झालेल्या या शिबिरात व्यसनमुक्तीचे महत्त्व, समुपदेशन तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

व्यसन ही फॅशन नसून एक आजार आहे; व्यसनाधीन व्यक्तीला गुन्हेगार न समजता त्याला उपचार आणि आधार देण्याची गरज आहे, असा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला.

याप्रसंगी नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांच्यासह दिनकर पवार, दिनेश पगारे, ज्योतीताई काजळे, आरतीताई भोज, आशाताई भोईर, ॲड. पुष्पाताई ढवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

व्यसनमुक्त समाजासाठी जागरूकता आणि इच्छाशक्ती हाच परिवर्तनाचा मार्ग असल्याचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें