शहरातील अनाधिकृत होर्डींग्सवर कारवाई करावी, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची मागणी
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)l
चाळीसगाव शहरात गेल्या काही महिन्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून यात अनेक तरुण आणि व्यवसायिक आपल्या जीवाला मुकले आहे. याचे कारण म्हणजेच शहरात विविध ठिकाणी मोक्याच्या जागेवर लावन्याय येणारे मोठमोठे होर्डिंग जाहिरात बॅनर असल्याचे शहरीवासीयांमधून चर्चिले जात आहे. अनेक वाहनधारकांचे या बॅनर्समुळे लक्ष विचलित होते, तसेच मोठ्या वाहनधारकांना छोटे दुचाकीस्वार व वाहने दिसत नसल्यामुळे अपघात होत आहेत हे अपघात टाळण्यासाठी या अनाधिकृत होर्डिंगसवर त्वरित कारवाई करावी तसेच यापुढे असे होर्डिंग लागू नये व शहरातील प्रमुख असलेल्या चौकांमध्ये म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, नागर रोड चौफुली, सदानंद हॉटेल चौक, राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज चौक, आनंदीबाई बंकट हायस्कूल चौक, अशा मुख्य रहदारीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक टाकावेत अशा आशयाची मागणीचे निवेदन आज राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने नगरपालिका मुख्याधिकारी, तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले आहे, या निवेदनाची दखल घेऊन त्वरित कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी
विरेंद्रसिंह राजपूत, दिलीप आबा घोरपडे, प्रेमसिंह राजपूत, सिद्धार्थ राजपूत, दिपक पाटील, सरदारसिंह राजपूत, निलेश राजपूत, करण राजपूत, किशोर राजपूत, सौरभ राजपूत, करण पवार, सुनील बिडे, सागर परदेशी, विकी परदेशी, अमोल पवार, ललित पाटील, अमोल लवटे, प्रशांत चव्हाण, आदी समाज बांधव उपस्थित होते.










