दालवडी जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

दालवडी जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

फलटण,  : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दालवडी, ता. फलटण, जि. सातारा येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता ४ थी, ५ वी आणि ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील सिद्धी संदीप जाधव आणि सौम्या नाथा कोलवडकर या दोघींनी प्रत्येकी २६६ गुण संपादन करून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. याशिवाय शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विहान विनोद शिंदे, नव्या ईश्वर बनकर, सार्थक ललासो बनकर, आराध्या सचिन शिंदे, आरोही सचिन जाधव, स्वरा नाथा कोलवडकर, आदर्श रमेशकुमार शिंदे, प्रणव पोपट जाधव, देवराज दत्तात्रय नलवडे, श्रीराज निलेश शिंदे, सार्थक संदीप अवघडे, वृषभ बाळू कोलवडकर, सार्थक नानासो शिंदे आणि सार्थक तानाजी कोलवडकर यांचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांच्या यशामागे मुख्याध्यापक जयवंत सावंत यांची प्रेरणा, मार्गदर्शक शिक्षक विनोद गोडसे, तब्बसुम मुलाणी, भगवान मदने आणि सीमा बनकर यांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत तसेच पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य महत्त्वाचे ठरले.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांकडून गुणवंत विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.

“गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा… यशस्वीतेची ध्येयपूर्ती!” या ब्रीदाला साजेसे यश विद्यार्थ्यांनी संपादन केले असून, त्यांच्या या कामगिरीमुळे दालवडी जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.

एव्हीबी माझा | विशेष प्रतिनिधी

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें