गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सकांवरील आरोपांची चौकशी करणारी समिती. 👉 कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा अमिता मडावी यांचा इशारा.

गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सकांवरील आरोपांची चौकशी करणारी समिती.

👉 कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा अमिता मडावी यांचा इशारा.

गडचिरोली : (चक्रधर मेश्राम ) गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी नागपूर येथे आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते. यानंतर चार सदस्यीय समिती आज गडचिरोलीत दाखल झाली आहे. दरम्यान कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा मडावी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अमिता मडावी यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयातील रुग्ण भरती केंद्र व कॉल सेंटर दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव, अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था तसेच दिव्यांग विभाग स्थलांतरित केल्याने रुग्णांना त्रास होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यपध्दतीमुळे अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टरांनी राजीनामे दिले, असा दावा करीत मडावी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांची चौकशी करुन बदली करावी, अशी मागणी केली.

यासंदर्भात नुकतेच आपण नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर गठित करण्यात आलेली चार सदस्यीय समिती गडचिरोलीत आली आहे. या समितीने निष्पक्ष चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी;अन्यथा ४ सप्टेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मडावी यांनी दिला. पत्रकार परिषदेला त्रिवेणी मेश्राम, कोमल भैसारे, प्रेमलता काणेकर, मंगला ब्राम्हणवाडे, माया गेडाम उपस्थित होत्या.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें