एव्हीबी माझा | विशेष वृत्त
फलटणला नवे उपविभागीय पो लीस अधिकारी; धन्यकुमार गोडसे नियुक्ती
फलटण : फलटणचे विद्यमान ज़ पोलीस अधिकारी खांबे यांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी धन्यकुमार गोडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशाल खांबे हे सध्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असल्याने पदोन्नती मिळेपर्यंत त्यांची नवीन नियुक्ती प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
धन्यकुमार गोडसे यांना फलटणच्या भौगोलिक परिस्थितीची तसेच येथील कायदा व सुव्यवस्थेची चांगली जाण आहे. यापूर्वी त्यांनी फलटण परिसरात पोलीस निरीक्षक म्हणून काम केले असून गुन्हेगारीविरोधातील कारवाई आणि प्रशासकीय अनुभवामुळे त्यांची ओळख सक्षम अधिकारी म्हणून आहे.
फलटण विभागात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करणे आणि नागरिकांशी समन्वय वाढवणे यासाठी गोडसे यांच्या अनुभवाचा फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे फलटण पोलिस दलाला अनुभवी नेतृत्व मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
विशाल खांबे यांच्या बदलीनंतर धन्यकुमार गोडसे लवकरच पदभार स्वीकारणार असून फलटणच्या नव्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून ते कामकाज पाहणार आहेत.
– संपादक : विजय भिसे, एव्हीबी माझा












