शिरंबे सोसायटीच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
सातारा प्रतिनिधी
कोरेगाव (शिरंबे) : सातारा जिल्ह्यातील पहिली संस्था म्हणून स्वतःच्या कार्यालयात सौरऊर्जा प्रकल्प उभारून कोरेगाव तालुक्यातील शिरंबे विकास सेवा सोसायटीने ऊर्जा बचत आणि स्वयंपूर्णतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. सोसायटी कार्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
सोसायटीचे चेअरमन राहुल चव्हाण,व्हॉईस सुशील भोसले,माजी चेअरमन ह.भ.प.नामदेव बाबुराव भोसले व संचालक मंडळाच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारण्यात आला.या सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव माजी चेअरमन ह.भ.प. नामदेव बाबुराव भोसले यांच्या कार्यकाळात करण्यात आला होता. सौरऊर्जेचा वापर वाढवून वीज खर्चात बचत करण्याबरोबरच पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.ग्रामीण भागातील सहकारी संस्थांनीही सौरऊर्जेचा अवलंब करावा असा संदेश या प्रकल्पातून देण्यात आला.
या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सौरऊर्जा संयंत्र खरेदी योजनेचा लाभ घेण्यात आला. या प्रकल्पानंतर या योजनेअंतर्गत आणखी २२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.तसेच ऋणानुबंध हायटेक सोल्युशन कोरेगावचे सचिन साखरे यांनी तांत्रिक मार्गदर्शन,शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी सहकार्य तसेच गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्यात मोलाची भूमिका बजावली. यावेळी विभागीय विकास अधिकारी खरात,विकास अधिकारी कांबळे व प्रभारी भुजबळ, तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी गायकवाड,कॅप्टन महादेव भोसले पारायण मंडळाचे अध्यक्ष, लव्हराज चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी चेअरमन अरुण जाधव, चंद्रकांत गायकवाड, रणजित भोसले, बाळासाहेब भोसले, माजी उपसरपंच संपत भोसले,जवाहर भोसले (एकसळ),चेअरमन रवींद्र भोसले (एकसळ)लेखनिक शशिकला यादव, शिपाई प्रदीप भोसले यांच्यासह पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविकात सौरऊर्जेचे महत्त्व आणि त्याचे आर्थिक फायदे यावर प्रकाश टाकण्यात आला.
सूत्रसंचालन सचिव किसन केंजळे यांनी केले तर सोसायटीचे चेअरमन राहुल चव्हाण यांनी आभार मानले.












