खंडाळा तालुका बार असोसिएशनच्या २०२६–२७ निवडणुकीचा निकाल जाहीर

खंडाळा तालुका बार असोसिएशनच्या २०२६–२७ निवडणुकीचा निकाल जाहीर

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

 

खंडाळा तालुका बार असोसिएशनच्या सन २०२६–२७ या कार्यकाळासाठी झालेल्या वार्षिक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

 

या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. विलायत मोलाना मणेर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी ॲड. अतुल रामचंद्र गाढवे, सचिवपदी ॲड. अजित शंकरराव शेळके यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिवपदी ॲड. धनंजय मोने व खजिनदारपदी ॲड. नितीन पिसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच महिला प्रतिनिधी म्हणून ॲड. अश्विनी सोनवणे व ॲड. सोनाली घुगरे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

अध्यक्षपदासाठी वैभवकुमार तानाजी क्षीरसागर, उपाध्यक्षपदासाठी शुभांगी मधुकर शिंदे–महांगरे तसेच सचिवपदासाठी मेघना हणुमंत अडसुळ–शेंडे हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र त्यांचा पराभव करत वरील उमेदवारांनी स्पष्ट बहुमताने विजय मिळविला.

निवडीनंतर बोलताना अध्यक्ष ॲड. विलायत मणेर म्हणाले,

 

“खंडाळा तालुक्यातील वकील बांधवांच्या हितासाठी, न्यायालयीन सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच तरुण वकिलांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी खंडाळा तालुका बार असोसिएशन कटिबद्ध राहील. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक व संघटित पद्धतीने काम करण्याचा आमचा संकल्प आहे.”

 

सदर निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. विलास माने, सहनिवडणूक अधिकारी ॲड. चिन्मय पंडित व ॲड. गायत्री काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत व यशस्वीरीत्या पार पडली.

 

या निवडणुकीस मार्गदर्शक म्हणून ॲड. सुभाषराव घाडगे, ॲड. के. डी. शेळके, ॲड. हिंगमिरे, ॲड. शौकत पठाण, ॲड. एम. वाय. मणेर, ॲड. शहा, ॲड. अमृत मोने, ॲड. संपतराव काळे, ॲड. आय. डी. खान, ॲड. हेमंत खरात, ॲड. माया खरात व ॲड. सारिका हाके अॅड अजित शेळके, अॅड सचिन धायगुडे, अॅड आनंद फडके, अॅड रोहिदास हाकेयांचे मार्गदर्शन लाभले.

 

ते पुढे म्हणाले,न्यायालयाचा बांधकाम प्रस्ताव मंजूर झाला असून त्याचा शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे.“ज्येष्ठ वकिलांचा अनुभव आणि नवोदित वकिलांचा उत्साह यांचा योग्य समन्वय साधत बार असोसिएशनची वाटचाल अधिक प्रभावी केली जाईल.”

 

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे बार असोसिएशनच्या सदस्यांसह विधी क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें