लोणंद–सातारा रोडवर मालवाहतूक ट्रक पलटी; रस्त्याच्या कडेला डिझेल सांडले, वाहतुकीला अडथळा
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
लोणंद हद्दीत पुणे–सातारा महामार्गावर (लोणंद–सातारा रोड) हॉटेल दुर्वांकर परिसरात आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील डिझेल रस्त्याच्या कडेला सांडले आहे पलट झालेला ट्रक वाहतुकीस अडथळा येत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून पत्र्यांच्या पेट्यांचा माल घेऊन आलेला ट्रक लोणंद येथील एका वखारीत काही पेट्या उतरवून सातारा दिशेने जात असताना हॉटेल दुर्वांकरजवळ पलटी झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसल्याचे समजते.पलटी झालेला ट्रक वाहतुकीला अडथळा ठरत आहे यामुळे वाहनचालकांना विशेष काळजी घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी अपघातग्रस्त ट्रक तातडीने हटवून, डिझेल सांडलेल्या ठिकाणी वाळू/माती टाकून सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर कारवाई झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.












