हिरापूर रोड वरील राष्ट्रीय महाविद्यालय ते गणेश मंगल कार्यलय पर्यंतचा रस्ता रुंदीकरण करण्यात यावा, परिसरातील नागरिकांची निवेदना द्वारे मागणी
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
हिरापूर रोडवरील राष्ट्रीय महाविद्यालय ते गणेश मंगल कार्यलय पर्यंतचा रस्ता हा रुंदीकरण सोबत काँक्रेटिकरण करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन परिसरातील नागरिकांनी आज दि. 18 रोजी नगर पालिका प्रशासन व चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन येथे दिले. या निवेदनात म्हटले आहे की, हिरापूर रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत खराब झाला असून या मार्गावरून दररोज हजारो वाहणांची वाहतूक होत असते. या सोबत विद्यार्थी आणि नागरिकांची देखील या रस्त्यावर वर्दळ असते, परंतु सद्यस्थितीत हा रस्ता अत्यंत अरुंद झाला असून वाढत्या रहदारीमुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होऊन रोज छोटे मोठे अपघात होत आहे, अवजड वाहनांकरता कन्नड घाट बंद असल्याने कन्नड कडे जाणारी सर्व वाहतूक याच रस्त्याने होत आहे. पाणी पुरवठ्याच्या व मलनिस्सारण योजनेच्या कामामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून त्यामुळे झालेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कालच या रस्त्यावर टँकरच्या धडकेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, त्यामुळे रस्त्याचे वाहतूक लक्षात घेता रुंदीकरण होणे फार गरजेचे आहे, या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे, जेणेकरून मोठी वाहने सहज जाऊ शकतील तसेच रस्त्याच्या कामासोबतच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी आणि रात्रीच्या प्रवासासाठी पथदिव्यांची सोय करण्यात याव्यात. संबधित विभागाने याबाबी कडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेनावर सूर्यकांत ठाकूर, विनीत गवळी, चिरागोदिन शेख, प्रशांत राजपूत, अजय परदेशी, धीरज वाघ, दिपक बाविस्कर, आधार महाले, प्रवीण मराठे, योगेश पाटील, जितेंद्र देवरे, रोहन देवरे, परेश वाघ, खुशाल बिडे, सूरज केसरनी, रवींद्र गवळी, प्रशांत ठाकूर, राकेश, ठाकूर, अनिल ठाकूर, योगेश राठोड, किशोर पिंगळे, दत्तू गवळी, सदाशिव गवळी, अनिल पाटील आदींच्या सह्या आहे.












