उत्तर कोरेगाव तालुक्यात अवैध दारू विक्रीचा महापुर
पोलीस प्रशासन मात्र पैसे कमवते अफाट
प्रतिनिधी सातारा
उत्तर कोरेगाव तालुक्यात व पिपोडे बुद्रुक एसटी स्टँड परिसरात सध्या अवैध देशी दारू पार्सल व विनापरवाना देशी दारूची जागोजागी विक्रीचे प्रमाण वाढल्याचे चित्र समोर येत आहे. वाठार पोलीस स्टेशनचे साहेब या उत्तर कोरेगाव तालुक्यातील व पिंपोडे बुद्रुक येथील अवैध देशी दारू पार्सल व विनापरवाना दारूची विक्री होत असलेल्या अवैध धंद्यावर आळा बसवणार का? अशी चर्चा पिपोडकरांच्याकडून होत आहे.
परवानाधारक देशी दारू दुकानातून दिवसाढवळ्या मोटर सायकलवर दारूचे बॉक्स ठेवून वीस ते पंचवीस खेड्यापाड्यातील होम डिलिव्हरी करीत आहे. या अवैध दारू माफियांवर लक्ष देतील का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
पोलीस निरीक्षकाला आपल्या हद्दीतील बेकायदेशीर अवैध देशी दारू विक्री आणि पार्सल सेवा बंद करण्यासाठी कठोर पाऊले उचलावे लागेल, केवळ किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे तर तात्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.












