नागपूर येथे “महाराष्ट्र युवा शासन पार्टी”च्या पक्ष स्थापना.

नागपूर येथे “महाराष्ट्र युवा शासन पार्टी”च्या पक्ष स्थापना.

👉 १४ जूनला रवी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन .

👉 अन्यायग्रस्त , बेरोजगार, क्रांतीकारी विचारांच्या युवक युवतींनी सामील होण्याचे आवाहन.

नागपूर,(प्रतिनिधी)दि. 4 जून 2026 :

कामगार, शेतकरी, बेरोजगार, शिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवती यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून नव्या राजकीय पर्यायाची मांडणी करण्याच्या उद्देशाने “महाराष्ट्र युवा शासन पार्टी” या राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या स्थापना पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही पत्रकार परिषद रविवार, दि. 14 जून 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता, रवी भवन, सिव्हिल लाईन, नागपूर येथे होणार आहे. पक्षाचे संस्थापक व क्रांतिकारी अध्यक्ष प्रा. आनंद मेश्राम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, अन्याय, भ्रष्टाचार, शोषण आणि बेरोजगारी विरोधात जनआंदोलन उभे करण्याचा तसेच कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा पक्षाचा निर्धार आहे. “हर एक अन्याय के खिलाफ हम पहली आवाज बनेंगे” हे पक्षाचे ब्रीदवाक्य असून सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि जनहिताच्या मुद्द्यांवर पक्ष कार्य करणार असल्याचे सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेत पक्षाची अधिकृत भूमिका, संघटनात्मक रचना, आगामी कार्यक्रमांची रूपरेषा तसेच राज्य व देशाच्या विकासाबाबतची भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. पक्षात सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या युवक-युवती, कामगार, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “बदल घडवायचा आहे, सत्ताच नाही तर अन्यायी अत्याचारी गुंड बदमास भ्रष्ट लोकांची तानाशाही उलथून टाकायची आहे” माझे राज्य, माझा देश आणि माझ्या देशातील प्रत्येक भारतीय माणसांचे सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी उंचावण्यासाठी कार्य करायचे आहे. या घोषणेसह महाराष्ट्र युवा शासन पार्टी समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें