सकाळीच ग्रामपंचायतला कुलूप! येरगाव्हाणमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड; पाच गावांतील नागरिक संतप्त

सकाळीच ग्रामपंचायतला कुलूप! येरगाव्हाणमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड; पाच गावांतील नागरिक संतप्त

कोरपना तालुका प्रतिनिधी – मनोज गोरे

कोरपना तालुक्यातील येरगाव्हाण येथील ग्रामपंचायत कार्यालयाचा भोंगळ व निष्काळजी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास विविध कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचलेल्या नागरिकांना मुख्य दरवाजावर कुलूप लागलेले आढळून आले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या ग्रामपंचायती अंतर्गत येरगव्हाण, गुडा, कमलापूर, बोरगाव खुर्द आणि बोरगाव बुद्रुक या पाच गावांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व गावांतील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी ग्रामपंचायतीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, कार्यालयच वेळेत सुरू नसल्याने पाचही गावांतील नागरिकांची कामे ठप्प झाली असून प्रशासनाचा ढिसाळपणा उघड झाला आहे.

ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची कणा मानली जात असताना, अशा प्रकारे कार्यालय बंद ठेवणे हा नागरिकांच्या हक्कांवरच घाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शासकीय योजना, जन्म-मृत्यू दाखले, विविध प्रमाणपत्रे यासाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायतीचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी निराशाच हाती लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

नागरिकांनी सांगितले की, “ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा कार्यालय वेळेपूर्वी बंद आढळून आले आहे. अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नाहीत.” यासोबतच ग्रामसेवकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नसल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांमध्ये दिनेश सुरु, गणेश हरबडे, मधुकर थेरे, सुरेश हेकाड, अरविंद सोयाम, प्रदीप आत्राम, अजय बल्की, विश्वजीत शेडमाके, अरविंद तुमराम, विक्रम शेडमाके, आशिष राजूरकर, भास्कर अहिरकर, कडू धुर्वे तसेच ग्राम वाशी येथील नागरिकांचा समावेश असून त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच कार्यालय नियमित वेळेत सुरू ठेवण्याची हमी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर