वाघोशीची मानसी धायगुडे नवोदय परीक्षेत यशस्वी

वाघोशीची मानसी धायगुडे नवोदय परीक्षेत यशस्वी

खंडाळा प्रतिनिधी 

गणेश गुरव

      खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाघोशी येथील कु. मानसी सचिन धायगुडे (इयत्ता ५ वी) हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नवोदय विद्यालय, सातारा येथे इयत्ता ६ वीमध्ये प्रवेशासाठी तिची निवड झाली आहे.

   मानसीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिला मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच तिच्या पालकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.

      खंडाळा पंचायत समिती गट विकास अधिकारी मा. अनिल वाघमारे ,गटशिक्षण अधिकारी निर्मला माने,गजानन आडे,शिक्षण विस्तार अधिकारी उर्मिला पवार यांनी मानसीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याशिवाय ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच वाघोशी ग्रामस्थांनीही तिचे अभिनंदन केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर